-संध्या पेडणेकर
उज्जैनच्या राजा विक्रमादित्याचे सावत्र वडील बंधू राजा भर्तृहरी कवी होते.. श्रृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक हे त्यांनी लिहीलेले तीन काव्यग्रंथ. त्यांच्या जीवनाचा पहिला भाग अक्षरशः सर्व प्रकारच्या सुखांचा भोग घेण्यात गेला. भोगाची त्यांनी अती गाठली होती.
पण अचानक त्यांच्या जीवनाची गाडी वैराग्याच्या वळणार वळली. घोर वैराग्य त्यांनी पत्करलं. त्यामुळे भोग आणि वैराग्याचं उदाहऱण देताना हटकून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर अशा या भोगात लिप्त असणार्या राजाला अचानक विरक्ती कशी झाली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.
राजा भर्तृहरींचा विवाह राजकुमारी पिंगलेशी झाला. नवविवाहितेच्या प्रेमात राजे आकंठ बुडाले.
राजा भर्तृहरींचा विवाह राजकुमारी पिंगलेशी झाला. नवविवाहितेच्या प्रेमात राजे आकंठ बुडाले.
त्यादरम्यान दरबारात एका ब्राह्मणानं राजाला आशिर्वादस्वरूप एक फळ दिलं. ते फळ खाणारी व्यक्ती दीर्घायुषी होणार होती.
राजा भर्तृहरींचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी ते फळ स्वतः खाण्याऐवजी पत्नीला दिलं.
पण पिंगलेचं प्रेम राजाच्या सारथ्यावर होतं. म्हणून मग, त्याच्या दीर्घायुष्याची कामना मनी बाळगून तिनं ते फळ सारथ्याला दिलं.
सारथ्याचं एका वेश्येवर प्रेम होतं. दीर्घायुष्य देणारं ते फळ सारथ्यानं त्या वेश्येला दिलं.
वेश्या चरित्रवान होती.
तिनं विचार केला, माझं आयुष्य वाढून काय होणार? दीर्घायुष्य खरं तर राजाला लाभायला हवं. तोच प्रजेचं पालन करतो, देशाचं रक्षण करतो.
ती ते फळ घेऊन दरबारात हजर झाली. फळाच्या गुणाचं वर्णन करून तिनं ते फळ राजाला अर्पण केलं.
राजे मात्र थक्क झाले. त्यांनी ते फळ आपल्या प्रिय राणीला, पिंगलेला दिलं होतं ना!
विचारपूस झाली, उलटतपासण्या झाल्या आणि खरं काय ते सगळ्यांसमोर उघड झालं.
भर्तृहरीना जीवनाच्या एकूण व्यर्थतेचा साक्षात्कार झाला. आतापर्यंत ज्या ऐशआरामात, ज्या सुखोपभोगात ते लोळत होते त्याची निरर्थकता त्यांना जाणवली. नात्यांचा फोलपणाची त्यांना ओळख पटली.
राजा भर्तृहरीनं मग संन्यास घेतला आणि ते तडक वनात निघून गेले.
घोर श्रृंगारी राजा भर्तृहरी घोर वैरागी बनला.
घोर श्रृंगारी राजा भर्तृहरी घोर वैरागी बनला.
No comments:
Post a Comment