त्या दिवशी धोबी आणि गाढव जंगलातून चालले असता एका मुशाफिराची नजर गाढवाच्या गळ्यात बांधलेल्या लॉकेटवर पडली. त्यानं धोब्याला थांबवलं. धोब्याला वाटलं, आता हा माझं गाढव मागणार. धोबी त्या मुशाफिराला म्हणाला, 'हे पहा, या गाढवावर माझं खूप प्रेम आहे. तुमच्याकडे सामानाचं ओझं बरंच आहे असं दिसतंय, पण काहीही झालं तरी मी हे गाढव विकणार नाही. त्याच्याशिवाय माझा कामधंदा चालणार नाही.'
धोब्याचं बोलणं ऐकून मुशाफिराला हसू आलं. तो मुशाफिर एक निष्णात जवाहिर्या होता - लोभी, कंजूस आणि लबाड. त्याला गाढव नको होतं- त्या गाढवाच्या गळ्यातील लॉकेटमधला मणी हवा होता. त्या मण्याची किंमत त्याला ठाऊक होती. धोब्याची खुशामत करत तो म्हणाला, 'नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. मला तुमचं गाढव नकोय. त्याच्या गळ्यात तुम्ही जे हे लॉकेट बांधलंय ना, त्यावर मी फिदा आहे. किती सुंदर मणी आहे यात. तो मणी मला हवाय. तुम्ही तो मणी मला विकाल का?'
धोबी फुशारला आणि त्यानं त्या मण्याची किंमत शंभर रुपये सांगितली. धोब्याला संशय येऊ नये म्हणून मग मुशाफिर भावात घासाघीस करू लागला. त्यानं त्या मण्याची किंमत पन्नास रुपये लावली. धोब्यानं मणी विकायला नकार दिला आणि तो पुढे चालला.
थोडं पुढे गेल्यानंतर धोब्याला आणखी एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीलाही तो मणी खरेदी करायचा होता. यावेळी धोब्यानं मण्याची किंमत 200 रुपये सांगितली. त्या व्यक्तीनं मोजून दोनशे रुपये धोब्याच्या हातावर टिकवले आणि मणी घेऊन तो तेथून निघून गेला.
धोबी काही पावलं पुढे चालला असेल नसेल, तेव्हढ्यात मागनं धावत येऊन पहिल्या मुशाफिरानं त्याला गाठलं. धापा टाकत तो म्हणाला, 'चल, तू म्हणशील ती किंमत. हे घे शंभर रुपये आणि दे तो मणी मला....'

पण आता वेळ निघून गेली होती. कुठे माघार घ्यायची हे त्या मुशाफिराला उमगलं नव्हतं.
आपण 200 रुपयांना तो मणी विकला असं धोब्यानं हसत हसत त्याला सांगितलं.

त्या मुशाफिरानं स्वतःच्या कपाळावर हात मारला. म्हणाला, 'अरे मूर्खा, काय केलंस तू हे! दोन लाख रुपयांचा हिरा तू दोनशे रुपयांना विकलास?'
धोबी त्याला म्हणाला, 'मी नाही, आपण मूर्ख आहात...महामूर्ख. मला त्या मण्याची किंमत ठाऊकच नव्हती. मी तो फक्त दहा रुपयांना लॉकेटसह खरेदी केला होता. माझा फायदाच झाला. पण माहीत असूनसुद्धा लाखो रुपये किंमतीचा मणी शंभर रुपयांत खरेदी केला नाहीत हा आपला महामूर्खपणाच नव्हे का?'-संध्या पेडणेकर

No comments:
Post a Comment