-संध्या पेडणेकर
नारद ब्रह्मचारी आहेत हे खरं, पण एकदा श्रीमतीवर त्यांची नजर गेली आणि ते मनोमन तिच्यावर फिदा झाले. श्रीमतीबरोबर आपला विवाह घडावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
योगायोग असा की, तुंबरूंचीही नजर श्रीमतीवर पडली आणि श्रीमतीशी आपला विवाह व्हावा असं नारदांसारखंच त्यांनाही वाटू लागलं.
एकमेकांच्या इच्छांबद्दल जेव्हा त्या दोघांना समजलं तेव्हा त्यांच्या मनात परस्परांबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. दुसर्यावर मात करून आपली इच्छा पूर्ण करण्याचा दोघांनी निश्चयच केला.
दोघेही विष्णूचे भक्त होते.
दुसर्याला मात देण्यासाठी विष्णूची मदत घेण्याचा दोघांनी निर्णय घेतला.
नारदांनी विष्णूकडे मदत मागितली, 'स्वयंवराच्या वेळी श्रीमतीला तुंबरूचा चेहरा अस्वलासारखा दिसो.'
तुंबरूंनी विष्णूला म्हटलं, 'स्वयंवराच्या वेळी श्रीमतीला नारदाचा चेहरा माकडासारखा दिसो.'
नेहमीसारखं विष्णूंनी 'तथास्तु!' म्हटलं. त्यांना खूप गंमत वाटत होती. स्वयंवराच्या वेळी काय घडते हे पाहाण्यासाठी ते स्वतःही उपस्थित राहिले.
स्वयंवराच्या वेळी हातात वरमाला घेऊन श्रीमती आली तेव्हा इच्छुक वरांच्या रांगेत अगदी शेवटी उभे असलेल्या नारद-तुंबरूंवर तिची नजर गेली. दुरून दोघेही अगदी उत्तम शरीरयष्टीचे वाटत होते.
पण ती जेव्हा इतर इच्छुक वरांना ओलांडून त्यांच्याजवळ पोहोचली तेव्हा त्यांच्यापैकी एकाचं डोकं अस्वलाचं आणि दुसर्याचं डोकं माकडाचं असलेलं पाहून ती चपापली.
तेवढ्यात तिची नजर विष्णूवर गेली. माणसाचा चेहरा पाहून तिला हायसं वाटलं आणि तिने विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली.
नंतर जे झालं त्यानुसार, स्वयंवराच्या वेळी जे घडलं होतं त्यामुळए नारद खुश होते कारण श्रीमतीने तुंबरूलच्या गळ्यात वरमाला गातलेली नव्हती आणि तुंबरू खुश होते कारण श्रीमतीने नारदाच्या गळ्यात वरमाला घातेली न्हती. नारदांना श्रीमती मिळाली नाही म्हणून तुंबरू खुश होते तर तुंबरूचा श्रीमतीने स्वाकर नाही केला म्हणून नारद खुश होते.
असंच होतं, इतरांचं भलं न होवो अशी इच्छा बाळगणार्यांना बहुतेक वेळा स्वतःलाच नुकसान सहन करावं लागतं.

No comments:
Post a Comment