-संध्या पेडणेकर
वारंवार होणार्या युद्धांमुळे देव आणि दानव जेरीस आले होते. म्हणून त्यांनी आपसात एक तह केला.
दोन्ही पक्षांनी ठरवलं की आता यापुढे युद्ध टाळायचं. त्यासाठी उपाय म्हणून सगळी शस्त्रास्त्रं दधीची ऋषींच्या आश्रमात ठेवायचं ठरलं.
महर्षी दधीचींनी सगळ्या शस्त्रास्त्रांचं आपल्या तपोबलानं पाण्यात रूपांतर केलं आणि ते पाणी ते प्यायले. त्यामुळे त्यांची हाडे अतिशय बळकट आणि अभेद्य बनली.
पण काही काळाने दानवांना स्वस्थ राहवेना. आधीच्या युद्धांमुळे आलेली क्षीणता भरून निघाली आणि त्यांनी पुन्हा देवांशी भांडण उकरून काढायचा प्रयत्न सुरू केला.
इंद्राकडून विश्वरूप असुराची हत्या घडली होती. याचंच असुरांनी मग निमित्त केलं. विश्वरूपाचा लहान भाऊ असलेल्या वृत्रासुराच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा स्वर्गावर आक्रमण करायचं ठरवलं.
पुन्हा इंद्रासमोर युद्धाचं संकट उभं राहिलं.
स्वर्गाच्या रक्षणासाठी वृत्रासुराची हत्या करणं अपरिहार्यच झालं. पण ब्राह्मण होता म्हणून विश्वरूपाच्या हत्येमुळे इंद्राला शिक्षा भोगावी लागली होती. त्याच्या भावाची हत्या करून पुन्हा ब्रह्महत्येच्या पातकाची शिक्षा भोगायची त्याची तयारी नव्हती.
आपली समस्या घेऊन इंद्र सल्ला मागण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेला.
ब्रह्मदेवानं इंद्राला समजावताना सांगितलं, "देवराज, हत्या करण्याच्या उद्देशानं जर कुणी आपल्यावर चाल करून आलं तर तो ब्राह्मण असला तरी आत्मरक्षणासाठी त्याची हत्या करणं हा दोष नव्हे. शिवाय आपण केवळ स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे करत नसून ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी हे युद्ध करणार आहात."
ब्रह्मदेवानं समजावलं तेव्हा इंद्राला थोडं हायसं वाटलं. त्यानं मग दधीची ऋषींच्या हाडांनी बनलेल्या शस्त्रानं असुरांचा नाश केला.
या घटनेमुळे देवांना आणखी एक गोष्ट समजली - आपल्या सोयीनुसार निर्णय फिरवणार्या धूर्त आणि कपटी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये.