-संध्या पेडणेकर
बरीच वर्षे परिश्रम करून एक माणूस पाण्यावर चालायला शिकला. दूरवर त्याची ख्याती पसरली. पाण्यावर चालणारा योगी म्हणून लोक त्याला ओळखू लागले, त्याला मान देऊ लागले.
एकदा तो माणूस रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेला. आपला चमत्कार दाखवून त्यांना हिणवायचा त्याचा विचार होता. मनात त्यानं स्वतःशी कित्येक वेळा संवाद म्हटले होते, - 'तुम्ही कसचे परमहंस, मी अस्सल परमहंस आहे! मी पाण्यावरसुद्धा चालू शकतो.'
त्यादरम्यान परहंसांचा मुक्काम नदीकिनारी दक्षिणेश्वराजवळ होता. भेट झाली तेव्हा योगी त्यांना म्हणाला, 'चला गंगेजवळ, मी तिथेच तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो.'
रामकृष्णांनी त्याला विचारलं, 'काय चमत्कार आहे तुझा?' तो म्हणाला, 'मी पाण्यावर चालू शकतो.'
रामकृष्ण म्हणाले, 'हे अजबच आहे. इतरांसारखा पोहायला का बरं शिकला नाहीस तू? पाण्यावर तरंगणं शिकायला तुला किती वर्षं लागली?' तो म्हणाला, 'तब्बल वीस वर्षे लागली.'
रामकृष्ण त्याला म्हणाले, 'हद्द आहे तुझी. वीस वर्षे फुकट घालवलीस तू. अरे, मला जेव्हा पैलतीरावर जायचं असतं तेव्हा मी नावाड्याला दोन पैसे देतो. दोन पैशात तो मला आपल्या नावेत बसवून पैलतीरावर सोडतो. दोन पैशांच्या सोयीसाठी तू आपल्या आयुष्याची वीस वर्षे वाया घालवलीस? शिवाय, आपल्याला दररोज पैलतीरावर जावंच लागतं असंही नाही. वीस वर्षात मी जास्तीत जास्त दहा-पंधरा वेळा पैलतीरावर गेलो असेन. चार-सहा आणे किंमतीचं कौशल्य तू मला महान चमत्कार म्हणून दाखवायला आला आहेस? कमाल आहे तुझी.'
घमेंड उतरल्यानं खजील झालेल्या त्या योग्यानं परमहंसांचे पाय धरले. क्षमा मागितली. त्याच्या अहंकाराचा मुखवटा गळून पडला.

---
No comments:
Post a Comment