-संध्या पेडणेकर
एकदा चीनचे प्रसिद्ध तत्ववेत्ते कन्फ्यूशियस यांना भेटायला एक माणूस आला. तो त्यांना म्हणाला, 'मला तपस्या करायचीय.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे. पण मला असं वाटतं की ध्यानधारणा शिकण्याआधी तू दोन ठिकाणांना भेट द्यावीस. असं कर, तू जुगाराच्या अड्यावर जा. तेथे लोक काय करतात ते लक्ष देऊन पाहा. स्वतः काहीही करायचं नाही, फक्त पाहायचं. आणि ते पाहून तुला काय वाटलं ते मला सांगायचं.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस कन्फ्यूशियसना भेटायला आला. म्हणाला, 'लोक वेडे आहेत.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे, आता मी साधनेचं दुसरं सूत्र तुला देतो. आता पुढचे दोन महिने तू स्मशानात जाऊन बस. तेथे जळणारी मढी पाहा.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस पुन्हा परतला. म्हणाला, 'आपण माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. माझे डोळे उघडले. हे जीवन एक मोठा जुगार आहे आणि त्याचा शेवट स्मशानात होतो, हे मला समजलं.'
कंन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'जीवनाचं रहस्य तू जाणलंस. आता तू ध्यानधारणेच्या अंतर्यात्रेसाठी निघू शकतोस.'

---
No comments:
Post a Comment