-संध्या पेडणेकर
एकदा टॉलस्टॉय भल्या पहाटे उठून चर्चमध्ये गेले.
आपण दरवेळी जातो तेव्हा देव भक्तांच्या गर्दीत असतो, आज आपण देवाला एकट्याला भेटू असा विचार त्यांनी केला.
पण ते जेव्हा चर्चमध्ये पोहोचले तेव्हा तेथे आधीच एक माणूस गुडघे टेकून बसला होता आणि देवाच्या मूर्तीबरोबर काहीतरी बोलत होता. तो बोलत असलेले काही शब्द टॉलस्टॉयच्या कानांवर पडले.
तो म्हणत होता, 'देवा मला माफ कर... सांगतानासुद्धा शरमिंधं व्हावं इतकी मी पापे केली आहेत. माफ कर मला...'
टॉलस्टॉयला वाटलं, किती महान व्यक्ती आहे ही. अगदी खुल्या दिलाने देवाकडे आपल्या हातून घडलेल्या पापांसाठी क्षमा मागतेय. पश्चातापानं बहुधा पोळून निघालेला दिसतोय.
तेव्हढ्यात त्या व्यक्तीची नज़र या माणसावर पडली. गोंधळून गेल्यासारखा वाटला तो क्षणभर. मग टॉलस्टॉयना म्हणाला, 'महाशय, देवाशी माझा जो संवाद चालला होता तो आपण ऐकला तर नाही?'
टॉलस्टॉय म्हणाले, 'हो, मला आपलं बोलणं ऐकू आलं आणि खरं सांगतो, धन्य वाटलं मला अगदी. आपल्या अपराधांची कबूली दिलीत आपण, मला आदर वाटतो आपल्याबद्दल.'
तो माणूस म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण कृपा करून आपण या गोष्टी इतर कुणाला सांगू नका. खरं तर या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी. आपण ऐकल्या म्हणता तर ठीक आहे, पण कृपया इतर कुणालाही सांगू नका. आणि सांगितल्या तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा... '
टॉलस्टॉयनी आश्चर्यानं विचारलं, 'पण आत्ता आपण देवासमोर आपल्या अपराधांबद्दल पश्चाताप व्यक्त करत होतात, आणि आता...'
तो माणूस म्हणाला, 'त्या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी होत्या. जगासाठी नव्हत्या त्या.'
टॉलस्टॉयना वाटलं, असं आहे तर, म्हणजे लोक इतर लोकांनाच घाबरतात, देवाला नाही!

---
No comments:
Post a Comment