-संध्या पेडणेकर
पंचतंत्रात भरुंड नावाच्या एका पक्षाची गोष्ट आहे.
भरुंडला दोन डोकी होती. म्हणजे धड एकच, पण त्या धडावर दोन माना, त्या मानांवर दोन डोकी, आणि या दोन डोक्यांवर प्रत्येकी दोन डोळे, दोन तोंडं, दोन चोची आणि दोन कान.
आपल्या या दोन डोक्यांच्या शरीरामुळे भरुंड इतरांमध्ये उठून दिसायचा. त्यामुळं तो नेहमी वेगळ्याच ताठ्यात असायचा. स्वतःला नेहमी इतरांपेक्षा श्रेष्ठ मानायचा.
एकदा भरुंडचं एक तोंड एक फळ खात होतं. खाता खाता ते तोंड उद्गारलं, 'वाः! किती स्वादिष्ट आहे हे फळ. अमृततुल्य चव आहे या फळाची. तोंडात सुखाची नुसतं कारंजं फुटतंय. चंदनाच्या की पारिजातकाच्या झाडाचं असेल?... कोणत्या झाडाचं फळ आहे कुणास ठाऊक. आधी मला हे खाऊन संपवू दे.'
मग ते डोकं फळ खाण्यात अगदी पूर्णपणे रंगून गेलं.
पण त्याचं बोलणं ऐकून इकडे दुसर्या डोक्याच्या तोंडाला पाणी सुटलं. दुसर्या डोक्यानं पहिल्या डोक्याला म्हटलं, 'मलासुद्धा चव घेऊ दे ना रे, थोडं दे मला.'
पहिल्या डोक्यानं म्हटलं, 'मी खाल्लं काय न् तू खाल्लं काय, सारखंच आहे. शेवटी फळ पोटातच जाणार ना? खाऊ दे मला. चवच घ्यायची म्हणतोयस तर तुला देऊन काय उपयोग, तू आणि मी एकच तर आहोत.' बोलता बोलता पहिल्या डोक्यानं पूर्ण फळ एकट्यानं फस्त केलं.
तेव्हापासूनच पहिल्या डोक्याबद्दलचा राग दुसर्या डोक्यात धुमसू लागला. सूड उगविण्याची संधी कधी मिळते याची दुसरं डोकं वाट पाहू लागलं.
एके दिवशी दुसर्या डोक्याला एक विषारी फळ मिळालं. ते फळ त्यानं पहिल्या डोक्याला दाखवलं आणि म्हटलं, 'स्वार्थी डोक्या, हे फळ किती विषारी आहे हे ठाऊक आहे का तुला? खाल्लं की पार गारद होणार खाणारा. आता मी हे फळ एकट्यानं खाणार आणि तुला चांगली अद्दल घडवणार.'
पहिल्या डोक्यानं दुसर्या डोक्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परोपरीनं त्याला पटवण्याचा प्रयत्न केला की बाबारे, तू हे फळ खाल्लंस तर आपल्या दोघांचेही प्राण निघून जाणार.
पण दुसर्या डोक्याला सूड उगवायचा होता. सुडाच्या आगीत तो अगदी आंधळा झाला होता.
त्यानं पहिल्या डोक्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही आणि ते विषारी फळ खाल्लं.
अशा रीतीनं दोन डोक्यांचा तो पक्षी मरण पावला.
सूडाच्या आगीत सर्वस्वाची राखरांगोळी होते.