-संध्या पेडणेकर
एक होती गोम.
गोम म्हणजे शंभर पायांचा कीडा.
ती वेगानं सरपटत कुठेतरी चालली होती.
एका सशाची तिच्यावर नजर पडली.
ससा पाहातच राहिला. त्याला वाटलं, ही गोम चालते तरी कशी? अबब! किती तिचे ते पाय. आधी कोणता पाय उचलायचा, मागनं कोणता पाय उचलायचा हे कसं कळत असेल तिला? भयंकर कठिण आहे बुवा. किती गणितं करावी लागत असतील हिला.
सशानं तिला हाक मारली. म्हणाला, 'अगं थांब. कुठे इतक्या लगबगीनं चाललीस? असं सांग, की तुझे इतके पाय आहेत तर त्यापैकी कोणता पाय कधी उचलायचा हे तुला कसं कळतं? चालताना कधी तुझी त्रेधा तिरपीट नाही उडत? कधी एकदम दहा पावलं उचलली असं वगैरे झालं का? तारांबळ होत असेल ना तुझी अगदी? खरं सांग, पायात पाय अडकून कधी पडली-बिडली होतीस की नाही? नाही? कम्मालचए. ए, मला शिकव ना हे गणित.'
खरं तर गोमेनं आपल्या पायांबद्दल असा आणि इतका विचार कधी केलाच नव्हता.
ती सुर सुर चालायची. जन्मली तेव्हापासूनच.
तिला आठवतं तेव्हापासूनच तिचे असे शंभर पाय होते.
कधी तिच्या मनात हा प्रश्न उठलाच नाही की आपल्याला इतके पाय कसे काय?
पहिल्यांदाच तिने खाली पाहिलं आणि ती घाबरली. तिला वाटलं - इतके पाय! शंभर! आपल्याला तर शंभरपर्यंत आकडेसुद्धा नीटपणे मोजता येत नाहीत.
ती सशाला म्हणाली, 'याबद्दल मी कधी विचारच केला नव्हता. आता तू लक्षात आणून दिलंयस तर करेन विचार. निरीक्षण-परीक्षण करेन आणि जो उलगडा होईल तो सांगेन तुला.'
पण मग ती गोम पुन्हा पहिल्यासारखी चालू शकली नाही.
थोडं अंतर कापलं आणि ती गळाठली.
आता ती चालत कुठे होती, आता तर तिला शंभर पायांचं गणित सोडवायचं होतं.
एवढीशी गोम आणि शंभर पाय! एव्हढीशी तिची ती अक्कल आणि एव्हढं मोठं गणित!
हे प्रचंड गणित ती सोडवणार तरी कशी?

No comments:
Post a Comment