-संध्या पेडणेकर
एकदा वाळवंटातील एका सरायमध्ये एक मोठा काफिला आला. काफिल्यातील सारे प्रवासी दिवसभराच्या प्रवासानं खूप थकले होते.
उंटांच्या मालकाने नोकरांना आज्ञा दिली आणि त्यानुसार उंटांच्या गळ्यात दोरखंड बांधले गेले. मग ते दोरखंड अडकविण्यासाठी खुंट्या गाडताना एकाच्या लक्षात आलं की एका उंटाचा दोरखंड आणि खुंटी दोन्ही हरवलेत.
उंटाला मोकळं कसं सोडणार, कारण रात्री तो चालत दूर निघून जाईल आणि हरवेल असं त्याला वाटलं. त्याने ही गोष्ट आपल्या मालकाला सांगितली. काफिल्याचा मालकाने सरायच्या मालकाकडे रात्रीपुरता दोरखंड आणि खुंटी मागितली. सरायच्या मालकानं दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की, 'खुंट्या किंवा दोरखंड आमच्याकडे नाहीत. पण तुम्ही असं का नाही करत? - तुम्ही खुंटी गाडल्यासारखं करा, उंटाच्या गळ्यात दोरखंड अडकवल्याचा अभिनय करा आणि उंटाला झोपून जायला सांगा.'
हा उपाय लागू होईल हे त्या काफिल्याच्या मालकाला पटेना, पण दुसरा इलाज नव्हता त्यामुळे त्यानं सरायच्या मालकाचं म्हणणं मान्य केलं. त्यानं खुंटी गाडण्याचा, दोरखंड उंटाच्या गळ्यात अडकवण्याचा अभिनय तंतोतंत केला आणि इतर उंटांसारखंच त्या उंटालाही झोपायला सांगितलं.
आश्चर्य म्हणजे, तोवर ताटकळत उभा असलेला उंट मालकाची आज्ञा ऐकून खाली बसला आणि झोपी गेला.
हे पाहून काफिल्याच्या मालकाला थोडं हायसं वाटलं.
सकाळी पुढल्या टप्प्याच्या प्रवासासाठी निघताना इतर सर्व उंटांच्या गळ्यात अडकवलेले दोरखंड काढले गेले, खुंट्या उखडून काढल्या गेल्या. सगळे उंट पुढल्या प्रवासासाठी सज्ज झाले. पण काल्पनिक दोरखंडाने जखडलेला उंट ढिम्म उभा राहिना.
काफिल्याचा मालक त्रासला. सरायच्या मालकापुढे त्यानं तक्रारीच्या सुरात गार्हाणं मांडलं. म्हणाला, 'काय चेटूक केलंत तुम्ही माझ्या उंटावर, आता तो उठून उभा राहायलासुद्धा तयार नाहीय. मी पुढच्या प्रवासाला निघणार कसा?'
सरायच्या म्हातार्या मालकानं म्हटलं, 'आधी त्याच्या गळ्यात बांधलेला दोर काढा आणि तो दोर बांधलेली खुंटी जमिनीतून काढा.'
काफिल्याच्या मालकानं बुचकळ्यात पडत म्हटलं, 'पण त्याच्या गळ्यात कोणताही दोरखंड नाही आणि तो कोणत्याही खुंटीला बांधलेला नाही...'
सरायच्य मालकानं म्हटलं, 'तुमच्या दृष्टीनं नाहीय. उंटाल मात्र आपण बांधले गेलेलो आहोत असंच वाटतंय. जा, खुंटी उपटा. दोरखंड काढा.'
काफिल्याच्या मालकानं मग उभे राहायला तयार नसलेल्या त्या उंटाजवळ येऊन त्याच्या गळ्यातील दोरखंड काढल्याचा अभिनय केला, खुंटी उपटल्याचा अभिनय केला.
आश्चर्य! अंग झटकत तो उंट उठून उभा राहिला आणि इतर उंटांसोबत पुढच्या प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
काफिल्यातील लोकांना याचं खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी सरायच्या मालकाला यामागील रहस्य काय असं विचारलं तेव्हा तो हसत त्यांना म्हणाला, ' बाबांनो, उंटच नव्हे तर माणसांचंही असंच असतं. काल्पनिक खुंट्यांना सगळे अडकलेले असतात. खरं तर, उंटांबद्दल मला काहीच अनुभव नाही, माणसांच्या अनुभवावरूनच मी तुम्हाला हा सल्ला दिला होता.'

No comments:
Post a Comment