-संध्या पेडणेकर
पराजित नेपोलियनला सेंट हेलेना नावाच्या एका बेटावर नजरबंदीत ठेवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी डॉक्टरही होते. विजयमोहिमेतही हे डॉक्टर नेपोलियनसोबत राहिले होते. साधारण कैदी बनून जीवन कंठावं लागणार्या नेपोलियनला पाहून त्यांना खूप वाईट वाटत असे.
एके दिवशी डॉक्टर आणि नेपोलियन बेटावर फेरफटका मारण्यासाठी निघाले. एका छोट्याशा पाऊलवाटेवरून ते दोघे चालले होते. तेवढ्यात समोरून डोक्यावर गवताचा भारा घेतलेली एक स्त्री आली. भारा एवढा मोठा होता की त्याखाली तिचा अर्धाअधिक चेहरा झाकला गेला होता. ती नीट पाहू शकत नव्हती.
डॉक्टर ओरडून तिला म्हणाला, 'दूर हो, दूर हो. पाउलवाटेवरनं कोण चाललंय याची कल्पना तरी आहे का तुला?'
गवत वाहून नेणार्या त्या स्त्रीच्या लक्षात काही येण्याअगोदर नेपोलियनने हात धरून डॉक्टरना थोडं बाजूला नेलं. ती स्त्री नेपोलियनच्या इतक्या जवळून पुढे गेली की तिच्य डोक्यावरच्या भार्यातील गवताच्या काही काड्यांचा नेपोलियनच्या शरीराला स्पर्श झाला.
डॉक्टरना खूप वाईट वाटलं, पण नेपोलियनवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी डॉक्टरांची समजूत घालत म्हटलं, 'गड्या, संपले ते स्वप्नभारले दिवस. आता जरा जागा हो. डोंगराला म्हटलं की सरक, नेपोलियन येतोय तर त्याला सरकावं लागलं असतं असे ते दिवस आता पालटले. आता गवत वाहून नेणार्यांसाटीसुद्धा आपल्याला सरकावं हे लागेलच.'
जय आणि पराजयाचा खरा अर्थ नेपोलियन जाणून होता.
एका कामगार स्त्रीसाठी नेपोलियनना आपला मार्ग वळवावा लागला याची डॉक्टरना मात्र चुटपुट लागून राहिली.

---
2 comments:
सुंदर कथा...
'श्रुतीसंवेदना'... मस्त.
Post a Comment