-संध्या पेडणेकर
अलेक्झांडरची शवयात्रा निघाली.
त्याची शवयात्रा पाहाण्यासाठी लाखो लोक जमले होते. तिरडीच्या दोन्ही बाजूंनी अलेक्झांडरचे दोन हात लटकत होते. सगळ्यांनाच या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं कारण अलेक्झांडर मोठा सम्राट होता, त्याची तिरडीसुद्धा लोकांनी इतक्या हलगर्जीपणानं बांधावी? असे कसे त्याचे दोन्ही हात अधांतरी लटकू दिले? कुणाच्याच कसं लक्षात नाही आलं?
पण मग हळूहळू लोकांना समजलं की हा हलगर्जीपणा नव्हता. खुद्द अलेक्झांडरचीच तशी इच्छा होती. त्यानं मरण्यापूर्वी सांगितलं होतं की माझी अंतीम यात्रा काढताना माझे दोन्ही हात लोकांना दिसतील असे तिरडीबाहेरच ठेवावे. त्यामुळे, जगज्जेता अलेक्झांडरसुद्धा शेवटी रिकाम्या हातीच गेला, जन्मभर विजयासाठी केलेला सगळा प्रपंच निरर्थकच होता हे लोकांना कळेल.
मरण्यापूर्वी काही वर्षांआधी अलेक्झांडर एका ग्रीक फकीराला डायोजनीसला भेटायला गेला होता. त्यावेळी डायोजनीसने अलेक्झांडरला विचारलं होतं, 'संपूर्ण जग जिंकून घेतल्यानंतर काय करायचं याबद्दल तू विचार केलायस का अलेक्झांडर?' डायोजनीसचा प्रश्न ऐकून अलेक्झांडरनं उदास स्वरात उत्तर दिलं, 'मला खूप चिंता वाटते. कारण, दुसरं जग नाहीय. तेव्हा, खरंच, हे जग जिंकून घेतल्यानंतर पुढे मी काय करावं?'
खरं तर अजून त्यानं संपूर्ण जग जिंकलेलंच नव्हतं, पण तरीही, जग जिंकून घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याची वासना बुभुक्षितच रहाणार होती!
मोठा जुगारी होता अलेक्झांडर. स्वतःजवळचं सगळं त्यानं डावावर लावलं आणि मोठमोठ्या लढाया जिंकून मोठमोठे ढीग लावले धन-संपदेचे.
त्याच अलेक्झांडरला मृत्यूपूर्वी जणू साक्षात्कार झाला.
रिकाम्या हाताने येतो आणि माणूस रिकाम्या हातीच जातो.
आपल्याला झालेला साक्षात्कार लोकांपर्यंत पोहोचावा अशी त्याची इच्छा होती. लोकांनीही आपले रिकामे हात पाहावे, जाताना अलेक्झांडर सोबत काहीही घेऊन जाऊ शकला नाही हे लोकांना कळावं अशी त्याची इच्छा होती..... मरणातही बरंच काही जिंकून नेलं त्यानं.

No comments:
Post a Comment