© संध्या पेडणेकर
जग जिंकल्यानंतर जगज्जेता अलेक्झांडर तत्ववेत्ता डायोजनीजला भेटायला गेला. तो गेला तेव्हा डायोजनीज सकाळच्या वेळी उन्ह अंगावर घेत वाळूत उघडा-वाघडा पडून होता. मोठमोठे राजे-महाराजे अलेक्झांडर आला की उभं राहून त्याचं स्वागत करत पण डायोजनीज उठलासुद्धा नाही. अपमानित झाल्यासारखं वाटून अलेक्झांडरला थोडं अस्वस्थ वाटलं. तरी तो म्हणाला, "आपल्याबद्दल बरंच ऐकलंय मी. म्हणून खूप दूरवरून मी आपल्याला भेटायला आलो. मला न घाबरणारे आपण पहिलेच. मी आलो म्हणून आपण उठून उभे सुद्धा नाही राहिलात. मी खूश आहे आपल्यावर. मी आपणासाठी काय करू ते सांगा."
डायोजनीज म्हणाला, "तू? माझ्यासाठी काय करणार तू?"
डायोजनीजचं बोलणं अलेक्झांडरला आवडलं नाही. तरीही डायोजनीजच्या निडरतेचं त्याला कौतुक वाटलं. थोडा वेळ गप्प उभा राहिल्यानंतर तो म्हणाला, "मी जगज्जेता आहे. आपणावर उपकार करण्यासाठी नाही आलो मी, आपल्याबद्दल मला वाटणारा आदर व्यक्त करण्यासाठी आलो. आपणासाठी काही करता आलं तर बरं वाटेल मला."
अलेक्झांडरच्या या विनम्र वागण्याचा डायोजनीज वर काहीही परिणाम झाला नाही. तो अलेक्झांडरला म्हणाला, "काही करायचंच म्हणतोस, तर बाबा जरा असा बाजूला होऊन उभा रहा. मला उन्ह शेकायचंय. तू मध्येच ऊन अडवून उभा आहेस. थोडा बाजूला सरकून उभा राहा. यापेक्षा अधिक तुला माझ्यासाठी काही करता येणार नाही आणि मला गरजही नाही कशाची."
http://classicalwisdom.com/diogenes-of-sinope |

No comments:
Post a Comment