-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची आणखी एक
कथा –
एकदा तिघे पुरुष भ्रमण करत
निघाले असता त्यांना दूर टेकडीवर एक सुंदर महाल दिसला.
लगेच त्यापैकी एक म्हणाला, “तुम्हाला ठाऊक आहे का, त्या महालात श्रीमती रूथ रहाते. चेटकीण आहे ती.”
लगेच त्यापैकी एक म्हणाला, “तुम्हाला ठाऊक आहे का, त्या महालात श्रीमती रूथ रहाते. चेटकीण आहे ती.”
दुसरा म्हणाला, “ते घर श्रीमती रूथचंच आहे
पण तिच्याबद्दल तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे बरं. अहो, ती चेटकीण नाही एक
सुंदर स्त्री आहे. अगदी स्वप्नाळू... नेहमी आपल्या स्वप्नांत चूर असते ती.”
तिसरा म्हणाला – “सुंदर आहेच पण मी असंही
ऐकलंय की ती खूप क्रूर, कठोर आणि पाषाणहृदयी आहे. ही आसपासची सगळी जमीन तिचीच आहे.
या जमिनीवर राबणाऱ्या कुळांचं ती अक्षरशः रक्त शोषून घेते म्हणे.”
बोलता बोलता ते गावात
पोहोचले.
समोरून एक म्हातारा येत असलेला त्यांना दिसला.
त्याला यांनी विचारलं, “काहो बाबा, त्या टेकडीवरल्या महालात कोणी श्रीमती रूथ रहाते तिच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?”
समोरून एक म्हातारा येत असलेला त्यांना दिसला.
त्याला यांनी विचारलं, “काहो बाबा, त्या टेकडीवरल्या महालात कोणी श्रीमती रूथ रहाते तिच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?”
म्हाताऱ्यानं तिघांकडे
पाहिलं न् मग म्हणाला, “हो, श्रीमती रूथ तिथे रहायच्या. म्हणजे, मी आता नव्वद
वर्षांचा आहे. माझ्या लहानपणी मी त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. पण मी साधारण
दहाएक वर्षांचा असेन तेव्हाच त्या वारल्या. तेव्हापासून हा त्यांचा महाल अगदी ओसाड
पडलाय. फक्त घुबडं घुमतात तिथे. काही लोक म्हणतात की तेथे भुतं रहातात.”
No comments:
Post a Comment