-संध्या पेडणेकर
जगातल्या प्रसिद्ध महिला संतांमध्ये सूफी संत राबियाचंही नाव येतं.
एकदा राबियाच्या घरी एक फकीर मुक्कामाला होता. धर्मग्रंथ वाचत असताना राबियानं एक ओळ पुसली हे त्यानं पाहिलं.
त्याला मोठं आश्चर्य वाटलं. धर्मग्रंथासारख्या पवित्र रचनेमध्ये राबिया खाडाखोड कशी काय करते?
त्यानं हा प्रश्न राबियाला विचारला.
राबियानं पुसलेली ओळ होती - सैतानाबद्दल घृणा बाळगा.
राबिया त्या फकीराला म्हणाली, "माझ्या मनात परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं आणि त्या प्रेमानं माझ्या मनाचा संपूर्ण पसारा व्यापला. आता माझ्या मनात घृणेसाठी जागाच नाही.
बहुधा असंच होत असावं. मनात परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं की कुणाहीबद्दल घृणा बाळगता येतच नाही - अगदी सैतानाबद्द्द्लसुद्धा! त्यामुळे धर्मग्रंथातली ही ओळ मला अनावश्यक वाटली आणि म्हणून मी ती खोडली"

No comments:
Post a Comment