©संध्या पेडणेकर.
सॉक्रेटीस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. सत्य बोलल्याबद्दल त्याला विष दोऊन ठार मारण्यात आलं. खरं बोलणं हाच केवळ त्याचा अपराध होता. त्यानं राज्याविरुद्ध बंडाळी केली नव्हती. तो क्रांतीकारकही नव्हता. म्हणजे क्रांती करून राज्य उलथून टाकण्याचाही त्याचा प्रयत्न नव्हता. त्याचं लोकांना फक्त एव्हढंच सांगणं होतं की बाबांनो, खोट्याची कास नका धरू. खोट्याचाच राजमार्ग असणाऱ्या शहरात कुणाला सहन होणार हे? न्यायालयात त्याच्यावर खटला गुदरला गेला, तो पटपट चालला आणि त्याला वीष देऊन ठार मारण्याची शिक्षा मिळाली. कोणतीही चालढकल न करता ती लागलीच अमलातही आणली गेली.

पण मनं सगळ्यांचीच निर्ढावलेली नसतात.
सॉक्रेटीसचा शिष्यवर्ग होता. समाजातील काही लोकही त्याच्या बाजूनं होते. अर्थातच
षंढ सहानुभूती कधी कुणाच्या उपयोगी पडत नसते. तशी या लोकांची सहानुभूतीही
सॉक्रेटीसच्या कामी आली नाही. त्याला मुख्य न्यायाधीशानं मृत्यूदंडाची शिक्षा
सुनावली. व्यवस्थेचा तो पाईक होता तरी निरपराध व्यक्तीला मृत्युदंड ठोठावताना
त्याला अपराधी वाटत होतं. नाइलाज होता त्याचा कारण ज्यूरींचं बहुमत सॉक्रेटीसच्या
विरोधात होतं. तरीही, आपल्या अधिकाराचा वापर करत मुख्य न्यायाधीशानं एक मार्ग
काढला. तो सॉक्रेटीसला म्हणाला,
“मी विनंती करतो की अथेन्स सोडून कायमचे निघून जायला तयार असाल तर आम्ही आपणास कोणताही दंड देणार नाही. अथेन्स सोडून निघून गेल्यानंतर आपणास जे वाटेल ते करायला आपण स्वतंत्र असाल, याबाबत अथेन्सवासियांची कोणतीही हरकत नसेल.”

सॉक्रेटीस त्यांना म्हणाला, “मी जिथे जाईन तिथे माझ्यावर
खटला चालवला जाईल. सत्य जिथे जाईल तिथे लोक दुखावतीलच. अथेन्ससारख्या सुसंस्कृत शहरात
सत्य जर असह्य होत असेल इतर कुठे ते सुसह्य ठरेल याची शक्यता नाही.”
मुख्य न्यायाधीशांनी त्याला आणखी एक संधी
देण्याचा प्रयत्न करत म्हटलं, “मग असं करा, आपण अथेन्समध्येच रहा. म्हातारपणात आपणास आम्ही
अथेन्सबाहेर काढू इच्छीत नाही. पण सत्य बोलणं बंद करा.”
यावर सॉक्रेटीस म्हणाला, “हे तर आणखी कठिण आहे. नव्हे
अशक्य आहे. मी जगू शकणार नाही. सत्य माझा श्वास आहे. श्वास घेतल्याशिवाय कुणी जगू
शकत नाही तद्वत मी सत्याची कास सोडू शकत नाही. जीवन उरो किंवा जावो, सत्याशिवाय
त्याचं काय मोल? आपण मृत्युदंड ठोठवावा हेच माझ्यासाठी उत्तम ठरेल. ऩिदान लोक म्हणतील तरी की-
त्यानं कोणतीही तडजोड स्वीकारली नाही, सत्यासाठी सॉक्रेटीस मेला.
--------------
Painting - 'Death Of Socrates' http://en.wikipedia.org/wiki/Trial_of_Socrates http://en.wikipedia.org/wiki/Socrates |