-संध्या पेडणेकर
व्यवहारचातुर्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल अशी ही ईसापनीतीतील एक गोष्ट.
एकदा एक सिंह, एक लांडगा आणि एक गाढव एकत्र शिकारीसाठी निघाले. तिघांनी मिळून भरपूर शिकार केली आणि मांसाचा ढीग जमवला.
मग सिंह लांडग्याला म्हणाला, 'तू या मांसाचे तीन समान वाटे कर. आपण तिघांनी मिळून शिकार केली तेव्हा प्रत्येकाला समान वाटा मिळायला हवा.'
लांडग्यानं सिंहाच्या म्हणण्याचं शब्दशः पालन केलं आणि मांसाचे तीन समान वाटे केले.
सिंहाला राग आला आणि त्यानं तत्क्षणी लांडग्यावर झेप टाकून त्याची मानगूट पिरगळली आणि मेलेल्या लांडग्यालाही मांसाच्या ढिगार्यावर टाकलं.
मग सिंह गाढवाकडे वळून म्हणाला, 'मांसाचे वाटे करायची जबाबदारी आता मी तुझ्यावर सोपवतो. समान दोन वाटे कर, आपल्या दोघांसाठी.'
गाढवानं मेलेल्या जनावरांच्या मांसामधून एक कावळा उचलला आणि बाजूला काढून ठेवला. मग मोठ्या ढिगाकडे इशारा करत तो सिंहाला म्हणाला, 'महाराज, हा आपला वाटा.'
सिंह एकदम खूश झाला. तो गाढवाला म्हणाला, 'वाः वाः, शहाणा आहेस. वाटण्या करण्याची कला कुठे शिकलास तू?'
गाढवानं सिंहानं केलेल्या प्रशंसेचा मान तुकवून स्वीकार केला. मग मनोमन तो बोलला,'या मेलेल्या लांडग्यानं मला सिंहासोबत केलेल्या शिकारीची वाटणी कशी करायची ते शिकवलं.'

---
No comments:
Post a Comment